मोठी बातमी – कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे ‘या’ जिल्ह्यात उद्यापासून मिनी लॉकडाऊन

बंद

पुणे – झपाट्याने वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता पुण्यात लॉकडाउन लागू करायचा की नाही, याबाबत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी पुण्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्यास कडाडून विरोध केला. तर प्रशासनाने देखील लॉकडाऊन नको पण निर्बंध अधिक कडक करावेत अशी भूमिका या बैठकीत घेतली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार वंदना चव्हाण, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

उद्यापासून (३ एप्रिल ) पुढील सात दिवसांसाठी हॉटेल, बार, मॉल, सिनेमागृह पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तर हॉटेलमधून होम डिलेव्हरी सुरु राहणार आहे. तर पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमपीएमएल पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहे. दरम्यान, सर्व धार्मिक स्थळे देखील पुढील सात दिवसांसाठी बंद असणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत अत्यावशक सेवा वगळता पूर्णपणे संचारबंदी असणार आहे. तर दिवसा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

असा असेल मिनी लॉकडाऊन

  • संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • आठवडे बाजार बंद मंडई सुरु राहणार
  • शाळा आणि महाविद्यालये ३० एप्रिलपर्यंत बंदच. मात्र, परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणार
  • पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस पुढील सात दिवस बंद. एसटी सेवा सुरू राहणार
  • हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल आणि चित्रपटगृहे बंद राहणार. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार
  • उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाणार
  • संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
  • विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत होणार
  • उद्याने ही पूर्वीप्रमाणे सकाळी सुरू राहणार
  • राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी

महत्वाच्या बातम्या –