मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत असल्यामुळे ३० एप्रिल पर्यंत मिनिलॉकडाऊन

बंद

बीड – राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढत पादुर्भाव बघता, लागू केलेला दहा दिवसांचा लॉकडाऊन रविवारी संपल्यानंतर सोमवारी जिल्ह्यात पावणे सहाशे नवीन कोरोना बाधित आढळले. रुग्णसंख्येचा हा उच्चांक असून संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढविली आहे.

सोबतच ३० एप्रिलपर्यंत काही निर्बंध व मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यानुसार आता ३० एपिलपर्यंत जिल्ह्यात मिनी लॉकडाऊनसारखी परिस्थिती असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीही राहणार आहे. जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सोमवार ते शुक्रवारी सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्रित येता येणार नाही.हा कालावधी वगळता उर्वरित कालावधीत नागरिकांना अत्यावश्यक कारणांशिवाय रस्त्यावर येता येणार नाही.

त्यामुळे दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी असे चित्र राहणार आहे. शनिवार व रविवार रोजी वैद्यकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना पूर्णत: बंद राहतील. हॉटेलच्या आतील आवारात असलेले सर्व रेस्टॅरंट आणि बार वगळता सर्व रेस्टॉरंट आणि बार बंद राहतील.

महत्वाच्या बातम्या –