मुंबई – कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता महाराष्ट्राचे शेतकरीही सामिल होत आहेत. राज्याच्या 21 जिल्ह्यांचे शेतकरी नाशिकहून मुंबई म्हणजेच 180 किलोमीटरपर्यंत रॅली काढत शनिवारी रात्री मुंबईत पोहोचले आहेत.
मुंबईतील आझाद मैदानात सभा झाल्यावर आंदोलक आझाद मैदान ते राजभवनापर्यंत कृषी कायद्याविरूद्ध मोर्चा काढतील अशी शक्यता आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीतून ट्रॅक्टर मोर्चा काढून या आंदोलनात सहभागी होत आहेत.सांगलीतील क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सांगलीतून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा कोल्हापूरच्या दिशेने येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने ट्रॅक्टरसह शेतकरी यामध्ये सहभागी होतील, असे राजू शेट्टी यानी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा; राज्यात ‘या’ दिवशी मुसळधार पाऊस
- पिठाची गिरणी, छोटे किराणा दुकान, मिनी दाल मिल आदींसाठी मिळणार महिलांना अनुदान
- आतापर्यंत सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांना देण्यात आली लस
- बिनपाण्याची शेती… महिन्याला दीड लाखांचं उत्पन्न