मोठी बातमी: राज्यात गेल्या 24 तासांत रेकोर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद

कोरोना

मुंबई – महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या 24 तासांत 63,294 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 349 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 34,008 बरे झाले झाले आहेत. या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या ही 34,07,245 झाली आहे. एकूण मृतांचा आकडा 57,987 झाला असून राज्यात सध्या 5,65,587 रुग्ण उपचार घेत आहेत. तर मुंबईमध्ये कोरोनाचे 9,989 नवे रुग्ण सापडले आहेत. नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 7,201 नवे कोरोनाबाधित. 63 मृत्यू. 3,240 बरे झाले. राज्यात आज तब्बल 7883 रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यात काल 55,411 नवे कोरोनाबाधित सापडले होते. 309 रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर मुंबईत हा आकडा 9327 एवढा होता.

दरम्यान बेड्सची संख्या, ऑक्सिजन उपलब्धता आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता या विषयावर आज मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य यंत्रणेवर असलेला ताणही कमी झाला पाहिजे, असं मत डॉक्टर्सनी व्यक्त केलं. राज्यात १४ दिवसांचा कडक लॉकडाऊन असावा, असं मत डॉक्टर तात्याराव लहानेंनी व्यक्त केलं आहे. लॉकडाऊन लागण्याआधी जनतेला १ ते २ दिवसांचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. नव्या स्ट्रेनबाबत उपाययोजनेची आवश्यकता असल्याचं मतंही डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केलंय. १४ दिवसांच्या कडक लॉकडाऊननेच कोरोनाची साखळी तुटेल, असं टास्क फोर्सच्या डॉक्टरांचं मत आहे.

महत्वाच्या बातम्या –