मोठी बातमी – कृषी कायद्याविरोधात आंदोलक शेतकऱ्यांचे नंदीग्राम एक्सप्रेस थांबवुन रेले रोको आंदोलन

किसान रेल्वें

नांदेड – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात किनवट येथे गुरुवारी रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. अखिल भारतीय किसान सभेने गुरुवारी अर्जुन आडे, शंकर सिडाम यांच्या नेतृत्वाखाली किनवट तालुक्यात नंदीग्राम एक्सप्रेस थांबवुन आंदोलन केले. शेतकरी कायदे रद्द करण्यासाठी देशव्यापी रेले रोको चक्का जाम आंदोलनाला पांठीबा देण्यासाठी किसान सभेने रेल रोको आंदोलन केले होते.

तीन कृषी कायदे रद्द करावे, हमीभाव खरेदीचा कायदा करावा, देशाची संपत्ती भांडवालदारांना विकणे थांबवा या आणि इतर मागण्यासाठी किनवट रेल्वेस्थानकावर आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस रोखण्यात आली. यावेळी उपस्थितांनी मोदी सरकारच्या देश विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात किसान सभेचे शंकर सिडाम, एकनाथ पाटील लोणीकर, सुभाष डाखोरे, सुभाष जाधव, जनार्दन काळे, नंदू मोदुकवार, महमुद पठाण, कैलास भरणे, शंकर घोडके, यमुनाबाई काळे, आदींनी सहभाग नोंदविला.

उमरी तालुक्यात शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

तर उमरी तालुक्यात काँग्रेसने दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. केंद्र व राज्य सरकारने हमी भावाप्रमाणे माल खरेदी करावा, यापेक्षा कमी भावाने माल खरेदी करणाऱ्यावर गु्न्हे दाखल करावे अशी मागणी यावेळी काँग्रेसने केली. यावेळी केंद्र शासनाच्या शेतकरीविषयक धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी उपमहापौर आनंदराव चव्हाण, गोविंदराव पाटील सिधीकर, तालुका आध्यक्ष प्रल्हाद पाटील आणि इतर पदाधिकारी उपस्थीत होते.

महत्वाच्या बातम्या –