मोठी बातमी – ‘या’ जिल्ह्यातील २८ तारखेपर्यंत शाळा राहणार बंद तर रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू

संचारबंदी

पुणे – पुण्यात कोरोना  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथील प्रशासन तयारीला लागले आहे. आरोग्य विभाग तसेच महापालिकेकडून वेगवेगळ्या योजना आखल्या जात आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येनुसार प्रशासनाची नेमकी काय तयारी आहे, याचा आढावा घेण्यासाठी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

या बौठकीत पुणे जिल्ह्यात २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कौन्सिल हॉल मध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक झाली. यात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात २८ तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानंतर रिव्ह्यू घेऊन शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय होईल. लग्न समारंभासाठी केवळ २०० जणांची मर्यादा घालण्यात आली आहे. हॉटेल्स ११ वाजेपर्यंत सुरू त्यानंतर बंद ठेवण्यात येणार आहेत.तसेच रात्री ११ ते सकाळी सहा संचार बंदी लागू करण्यात येणार आहे.

दरम्यान, राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या नव्याने वाढते आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूची नवी प्रजाती आढळली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पुणे महापालिकेनेसुद्धा वाढत्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे. महापालिकेनं रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड्स तसेच इतर उपकरणं उपलब्ध करुन  दिले आहेत. तसेच महापालिकेकडून 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये प्रत्येकी किमान तीन क्युआरटी टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक टीममध्ये आरोग्य निरीक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –