मोठी बातमी – आज मंत्रिमंडळाची बैठक; राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढणार का ?

बंद

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने स्थिती आटोक्यात येताना दिसत असली तरी धोका मात्र अद्याप कायम आहे. १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात लॉकडाऊन लागू असला तरी राज्यातील अनेक भागात रुग्णवाढ काही कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढण्याचे चिन्ह आहेत.

लॉकडाऊन नंतर रुग्णसंख्या बऱ्यापैकी घटली आहे. मुंबई, ठाण्यात रुग्णवाढ कमी झाली आहे, मात्र मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित काही भागात रुग्ण वाढतच आहेत. अशा स्थितीत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून लॉकडाऊन पुन्हा वाढवण्याचा निर्णय घेऊ. असे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढणार का ? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या –