मोठी बातमी – उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे दिले आदेश

उद्धव ठाकरे

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पळत नसल्याने मुख्यमंत्र्याने ही भूमिका घेतली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारष्ट्रातील प्रशासनाला लॉकडाऊनच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती सध्या मिळत आहे. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीसध्याची परिस्थिती पाहता राज्याला १५ दिवस लॉकडाऊनची गरज असल्याचे सांगितले आहे.

रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्यामुळे रुग्णांसाठी बेड्स, अन्य आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. अशावेळी टास्क फोर्सची महत्वाची बैठक आज पार पडली. राज्यात निर्बंध आणि नियमांचं कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावरही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

सदर बैठकीतील महत्वाचे निर्णय :-

  • प्रशासनाने लॉकडाऊनची तयारी करावी.
  • मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे. त्याची कार्यपद्धती ( एसओपी) मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी. जेणे करून नियोजनबद्धरीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
  • ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.
  • गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा.
  • मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील त्यामुळे ई आयसीयू , व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
  • प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी..
  • विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
  • सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील ग्रामीण भागात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्काचा शोधअधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली. विशेषत: छोट्या श्रांत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान असून ई आयसीयू वर भर देण्यासाठी पाउले उचलण्यात येतील असे सांगितले. महाराष्ट्रातील लसीकरण देशात चांगले असून ग्रामीण भागात उपलब्ध शीत साखळी वापरून उपकेंद्रांवर लसीकरण वाढवले तर अधिक वेग मिळेल असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –