मोठी बातमी – केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा दिले शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचे संकेत

नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली – शेतक-यांना उद्धवस्त करणारे काळे कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११० दिवसांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. परंतु हे कृषी कायदे मोदी सरकारने रद्द केले नाहीत. तसेच आतापर्यंत हा मुद्दा सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये जवळपास अकरा वेळा बैठका झाल्या. या बैठकांमध्ये जवळपास 45 तास बातचीत झाली. मात्र. इतके प्रयत्न करुनही हा मुद्दा मार्गी लागला नाही.

त्यांनतर आता केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसोबत बातचीत करण्याचे संकेत दिले आहेत.मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, की सरकार आणि शेतकऱ्यांमधील गतिरोधक हटवण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकरी संघटनांनी हा मुद्दा सोडवण्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन करताना ते म्हणाले, सरकार हा मुद्दा सोडवण्यासाठी मार्ग काढेल. केंद्र बातचीत करण्यासाठी तयार आहे आणि हा मुद्दा सरकारला सोडवायचा आहे.

केंद्रातील मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर मंजूर करवून घेतलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात शेतकरी संघटनांनी शुक्रवार २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली होती. या भारत बंदला काँग्रेस पक्षाचा सक्रीय पाठिंबा होता.

महत्वाच्या बातम्या –