राज्यातील ‘या’ जिल्ह्यात परदेशी पक्ष्यांमुळे ‘बर्ड फ्लू’

‘बर्ड फ्लू

परभणी – परभणीतील मुरुंबा गावात ८०० कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा अहवाल बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. मराठवाड्यात जायकवाडीसह अनेक पाणथळ जागा आहेत, जेथे स्थलांतरित परदेशी पक्षी मोठ्या संख्येने येतात. मुरुंबा गावापासून जवळपास अडीच किमी अंतरावरील रहाटी बंधाऱ्यावर येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांनी बर्ड फ्लू येथे आणल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मार्कंडेय यांनी व्यक्त केला.

जिंतूर तालुक्यात येलदरीसह येनोली, कहळा, रायखेडा, बोरी, चारठाणा, नवळी तसेच पिंगळगड नाला, उजळंबा, रहाटी बंधाऱ्यातील पूर्णा नदी, गंगाखेडमधील गोदावरी नदी परिसरात दरवर्षी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होत असते. यंदा मात्र कमी प्रमाणात स्थलांतरित पक्षी येथे आल्याचे जिंतूर येथील पक्षिमित्र अनिल उरटवाड यांनी सांगितले.

दरम्यान, बर्ड फ्लूचा प्रसार हा नेहमीच स्थलांतरित पक्ष्यांमार्फत झाल्याचा आजपर्यंतचा अभ्यास आहे. आपल्याकडे काही ठिकाणी याचा प्रसार होताना दिसत आहे. आजवर या राज्यात कधी, तर त्या राज्यात बर्ड फ्लू झाल्याचे घोषित करण्यात येते. आता परभणीतील मुरुंबात कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथे दक्षता घेण्याची गरज डॉ. मार्कंडेय यांनी व्यक्त केली. यापूर्वी २००६ मध्ये नवापूर, नंदुरबार, धुळे आदी ठिकाणी बर्ड फ्लू आला होता.

महत्वाच्या बातम्या –