पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं? पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही

निलेश राणे

नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी अवघ्या जगाचे लक्ष भारताकडे लागले असताना शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली समाजकंटकांनी राजधानी दिल्लीमध्ये धुडगूस घातला. शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण लागले.देशाच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न काल झाला.
कालच्या हिंसाचाराच्या घटनेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून 15 गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकरबा चौक, गाझीपूर, सीमापुरी, नांगलोई टी पॉंइंट, टिकरी बॉर्डर आणि लाल किल्ला भागात झालेल्या हिंसेत 86 पोलीस कर्मचारी जखमी झाले अहेत. तसेच या हिंसेत 17 खासगी गाड्यांचे नुकसान झाले आहे. गाजीपूर, सिंघु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचे बॅरीकेड्सही तोडले आहेत.

जगभरातून या हिंसाचाराचा निषेध व्यक्त केला जात आहे. या कालच्या लाजिरवाण्या घटनेमुळे भारताची मान शरमेने झुकली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान,भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.पोलिसांना मारणाऱ्यांना शेतकरी म्हणायचं?? पोलिसांना पाहिजे तेंव्हा त्यांनी जागा रिकामी केली असती पण आज पर्यंत माणुसकी दाखवली. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं, हे कुठलाही शेतकरी करू शकत नाही. या जमावाला कायदा बदलून हवा की कायदा बिघडवायचा आहे???असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या –