करटोली – पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली,कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतू चवीला हटके आणि आरोग्यादायी आहेत. पावसाळ्यातील रानभाजीपैकी करटोली ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते. त्यामुळे या भाजीचा यंदा नक्की स्वाद चाखा.चला तर जाणून घेऊ फायदे…
- करटोलीमध्ये फायबर आणि अॅन्टी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते.
- पावसाळ्याच्या दिवसात इंफेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते.
- शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील phytochemicals घटक मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृद्यविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते.
- मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
- करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटीन, आयर्न घटक मुबलक असतात तर कॅलरीज अत्यल्प असतात.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 19 ते 25 मार्चपर्यंत संध्या. 7 ते सकाळ 6 वाजेपर्यंत संचारबंदी
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- राज्यात लवकरच कडक निर्बंध लागणार; राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
- आता राज्य सरकार शेतमालाचा दाम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे पाठवणार