फुलकोबीला बाजारात केवळ चार रुपये किलो दर

फुलकोबीला बाजारात केवळ चार रुपये किलो दर cauliflower

गेल्या काही दिवसं पासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्याव फुलकोबीला बाजारात केळ चार रुपये किलो दर मिळत आहे. शेतापासून बाजारपेठेत नेण्याचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर शेकडो हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. यावर्षीही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली. भेंडी, मिरची, फुलकोबी, पानकोबी आदींची लागवड करण्यात आली. मात्र गत १० दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाचा फटका भाजीपाला पिकाला बसला.

डाळिंबाची निर्यात होत असल्याने डाळिंबाला चांगले दर

शेतात फुलकोबी सडण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ही कोबी बाजारात विक्रीसाठी नेली. मात्र गोबीचा व्यापारांनी लावलेला भाव पाहून शेतकऱ्यांनी चिंतेत आले आहे. पालांदूरमधील  शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून टप्प्याटप्प्याने फुलकोबीची लागवड केली होती. त्यात टप्प्याने फुलकोबी निघणे अपेक्षित होते. परंतु निसर्गाने दगा दिला आणि सर्व कोबी एकाच वेळेस काढायला आली. काढणी, वाहतूक खर्च वगळता शेतकऱ्यांच्या हाती काहीच उरत नाही. एकदम भाव पडल्याने शेतकºयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.