राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

पाऊस

लातूर – लातूर जिल्ह्यात दिनांक २० ते २२ मार्च या कालावधीत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणाऱ्या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास दयावे, असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिलेत.

हवामानात सातत्याने बदल होत असून मराठवाड्यात पुढील तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट, गारपीट तसेच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्यातर्फे देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने बीड, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय उद्या शुक्रवारी उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर औरंगाबाद, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांत वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

ही घ्यावी काळजी
या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे, शेतकऱ्यांनी दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत शेतीची व इतर कामे करू नये. कारण याच कालावधीतमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झडाखाली, पाण्याच्या स्त्रोताजवळ, विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा. पाऊस सुरू असताना विजेच्या तारा, जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –