आज मराठवाडयातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता

पाऊस

औरंगाबाद -12 ते 14 एप्रिल 2021 या कालावधीत मराठवाडयातील अनेक जिल्हयामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस येण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत. यामुळे नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवत, नैसर्गिक हाणी बद्दलची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहे. वीज पडण्याची शक्यता लक्षात घेत मराठवाड्यातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यासाठी काही गोष्टी कटाक्षाने पाळण्याचे विभागाने सांगितले आहे. यात विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये. या कालावधीमध्ये वीज पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झाडाखाली /पाण्याच्या स्त्रोताजवळ/ विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करुन स्वत:सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा.

पाऊस सुरु असताना विजेच्या तारा / जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते, तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. अशा सुचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी / तलाठी / मंडळ अधिकारी / ग्रामसेवक / सरपंच / कृषि सहाय्यक यांचेव्दारे निर्गमित करुन तालुक्यातील गावाना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करण्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –