राज्यातील ‘या’ भागांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता

पाऊस

मुंबई – राज्याबरोबर संपूर्ण पाऊसाचा देशात हाहाकार  आहे पाऊसाचे शांत होण्याचे काही संकेत दिसत नाहीत. राज्यात, देशातच नाहीतर दक्षिण आशियावर या पावसाचे संकट अजून ४ महिने राहणार असल्याचा दावा हवामान खात्याने सांगितले आहे

राज्यात, देशात आणि दक्षिण आशियात पुढचे ४ महिने पाऊस हाहाकार असू शकतो. ऑगस्टपासून दक्षिण आशियावर ला निनाचा प्रभाव आहे. ला निना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण होणं. सध्या महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्या आहे. मात्र, अद्यापही सरकारकडून कोणतीच मदत जाहीर करण्यात आली नाही.

दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने मोठा हाहाकार घातला आहे. हा पाऊस (rain) पुन्हा एकदा बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तर मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या –