मुंबई – हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. काल विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी वर्गात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
पुणे, महाबळेश्वर, औरंगाबाद, अकोल्यात जोरदार सरी बरसल्या. अरबी समुद्रातून सध्या उत्तर-पश्चिम भारतात बाष्पाचा पुरवठा होत असल्यानं या भागात पाऊस होतोय. राज्यातही हवेची चक्रीय स्थिती आहे. त्याचप्रमाणे सध्या कर्नाटकच्या किनाऱ्यापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याच स्थितीमुळे गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाऊस आहे. मराठवाडा आणि विदर्भात या दरम्यान गारपीटही झाली. कमी दाबाचे क्षेत्र क्षीण होत असले, तरी राज्यात आज आणखी दोन दिवस पावसाचे सावट राहणार आहे.
IMD GFS model guidance for 23 Mar indicates continuing of similar weather, TS 🌩🌧with gusty winds & light to mod rains with possibility of hailstorms at isolated places in interior of Maharashtra. @RMC_Mumbai@RMC_Nagpur have already issued weather warnings. Pl watch updates. pic.twitter.com/6vjYSpjGDI
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 22, 2021
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 मार्चला असे हवामान असेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात काही ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. तसेच हलका स्वरुपाचा पाऊस पडरण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाशिम जिल्ह्यात सकाळपासून विजांच्या कडकडासह जोरदार अवकाळी पावसाला सुरवात झालीय. सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यात आज पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली असून शेतकरी मात्र अडचणीत सापडलाय.
महत्वाच्या बातम्या –
- शेतकऱ्यांवर मोठं संकट; राज्यात आणखी दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता
- दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
- शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी विम्याच्या प्रतिकात्मक अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज सकाळपासून विजांच्या कडकडासह अवकाळी पावसाला सुरवात
- झोपण्यापूर्वी दुधात तूप टाकून प्या, होतील खास फायदे