लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं ‘हे’ मोठं विधान

उद्धव ठाकरे

मुंबई – गेल्या वर्षी कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला होता. आता कोरोनाचे सावट कमी झाल्याचं आकड्यांवरून समोर येत होतं. मात्र, यामुळे नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घ्यावयाची पुरेशी काळजी टाळल्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा एकदा वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे. योग्य वेळी या वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार तत्पर असल्याचं दिसून येत आहे.

कोरोनाच्या मागील लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ झाली होती. यानंतर, दिवाळीनंतर पुन्हा ही संख्या वाढेल असं सांगण्यात येत होतं. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असल्याचे व ब्रिटनमधील नव्या कोरोनाचा संसर्ग योग्य खबरदारीमुळे टळले होते. आता कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याचं समोर येत आहे.

याबाबत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात महत्वाची बैठक देखील पार पडल्याचे सांगण्यात येत आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कठोर निर्बंध लावण्याचे संकटे दिल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील याबाबत भाष्य केलं आहे. ‘लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे.’ असं ठाकरे म्हणाले. टीमउळे येत्या काळात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास लॉकडाऊन करण्यावाचून पर्याय राहणार नाही असं देखील त्यांनी सूचित केलं आहे.

राज्यातील कोरोना स्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत वाढता कोरोना, रुग्णसंख्या, मृत्यूदर यांसह इतर गोष्टींवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

यासोबतच, त्यांनी कंटेनमेंट झोनबाबत देखील सूचना केल्या आहेत. ‘जिथे कंटेनमेंट आवश्यक आहे तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा. लोकांमध्ये बेफिकिरी आली असली तरी स्थानिक प्रशासन व पोलिसांत कर्तव्यात ढिलाई नको. ज्या ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉक डाऊन उठविण्यासाठी आपणाकडे येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घ्या,’ असे निर्देश देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या –