नागरिकांनी कठोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल

संचारबंदी

परभणी – कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाची परभणीच्या नागरिकांनी कठोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रविवारी दुपारी एका पत्रकाच्या माध्यमातून दिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुढील काळात नागरिकांनी स्वत: शिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यात मास्क लावणे, कार्यालये, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर यांचे पालन करावे, त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावावे, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे. कोरोना (कोविड -19) मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

पुन्हा जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढणार नाही, याबाबत खबरदारी घेणे खुप आवश्यक आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोना संसर्गात होणारी वाढ लक्षात घेता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे मुगळीकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरु नये, म्हणून आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढवल्या आहेत. तर खबरदारी म्हणून इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे देखील सुरु केले आहे.

नागरिकांची बाजारपेठ, दुकानांवर व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाकडून मोहिम हाती घेतली आहे. यावर दंडात्मक कारवाई सुरु आहे. परंतू या उपाययोजना करूनही बाजारपेठ, सावर्जनिक ठिकाणी होणारी गर्दी पाहता सरकारने ठरवलेल्या त्रिसुत्री ज्यात मास्क वापरणे, कार्यालये, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर याचे पालन होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पुढील काळात नागरिकांनी स्वत: शिस्तीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. मास्क, आस्थापना, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतर यांचे पालन न केल्यास प्रशासनास नाईलाजास्तव लॉकडाऊन करण्यासारखा कडक निर्णय घ्यावा लागेल. असेही मुगळीकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

त्यामुळे नागरिकांनी तोंडाला मास्क लावावा, कार्यालये, व्यापारी दुकाने या ठिकाणी सॅनेटायझर व सामाजिक अंतरासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याचे रोगाचा प्रसार रोखण्यासमदत होणार आहे. आपण सर्व या आवाहनास प्रतिसाद द्याल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या पत्रकात व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –