राज्यात थंडीची हुडहुडी! येत्या दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज

थंडी

मुंबई – भारतात पुढील काही दिवस थंडी (Cold) मोठ्या प्रमाणात वाढणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे, भारतातील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढणार (cold will increase) असल्याची माहिती मिळाली आहे, तर महाराष्ट्रात हवामानात (Weather)  मोठा बदल होणार असून थंडी चांगलीच वाढणार आहे, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये थंडी वाढणार आहे,  मागील काही दिवसांमध्ये तापमनात घट होत असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यात थंडी जाणवू लागली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) आली आहे, त्यामुळं महाराष्ट्रात  येत्या दोन दिवसांत तापमानात (Temperature) आणखी घट होण्याचा अंदाज केंद्रीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. उत्तर भारतात तर पारा घसरला आहे. आता आणखी पुढील दोन दिवस थंडी (Cold)  वाढणार असल्याचे भारतीय हवामान (Weather) विभागाने सांगितले आहे.तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे, राज्यातील परभणी जिल्ह्यातील तापमान 10 अंशापर्यंत खाली आहे. याचबरोबर राज्यातील  हिंगोली, वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  तर तापमान 12 ते 13 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –