लाल कांदा सांगून नित्कृष्ट दर्जाच्या पांढऱ्या कांद्याचे बियाणे देऊन शेतकऱ्याची फसवणूक, कंपनीविरोधात तक्रार

औरंगाबाद – लाल कांदा सांगून नित्कृष्ट दर्जाच्या पांढऱ्या कांद्याचे बियाणे देऊन कंपनीने कन्नड तालुक्यातील देवळाणा येथील शेतकरी ज्ञानेश्वर सुरासे यांची फसवणूक केली आहे. यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. संबधित कंपनीने नुकसान भरपाई देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने कंपनीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरासे यांनी तीन एकर क्षेत्रात उन्हाळी कांद्याची लागवड केली. यासाठी गंगापुर तालुक्यातील काटे पिंपळगांव येथिल कृषी सेवा केंद्रातून ६ आक्टोंबर २०२० रोजी १६ हजार ७५० रुपये किमतीचे एका कंपनीचे पाच किलो कांदा बियाणे खरेदी केले होते. यानंतर त्यानी ७ आक्टोंबर २०२० रोजी गादी वाफ्याद्वारे रोपनिर्मिती करून ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात रोपाची तीन एकर क्षेत्रात लागवड केली.

१५ डिसेंबर २०२० रोजी रोपांची लावणी शेतात केली या पश्चात मार्च २०२१ मध्ये तपासणी केली असता सदर बीज हे पांढऱ्या कांद्दाचे असल्याने लाल गावरान कांदा न येता पांढरा कांदा शेतात उत्पादित झाल्याचे दिसून आले तर कांद्याला मोठ्या प्रमाणात डोंगळे देखील आहे. लाल गावरान कांदा येण्या ऐवजी निकृष्ट दर्जाचा पांढरा कांदा उगवला आहे.

या प्रकारामुळे सुरासे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कांदा बियाणे विक्री करणाऱ्या व संबधित कंपनीकडे दाद मागितली असता कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली. शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी व पं.स. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे दाद मागितली. याबाबत दि. ४ मार्च रोजी शेतकरी ज्ञानेश्वर सुरासे यांच्या शेतात कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी केली. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सुरासे यांनी कृषी अधिकारी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या –