शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून द्या, ‘या’ आमदाराची हात जोडून विनंती

शेतकरी

औरंगाबाद – शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन थकीत बीलापोटी कट करण्याची मोहिम महावितरणने नुकतीच हातात घेतली आहे. अतिवृष्टी, कोरोना संक्रमन लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याप्रमाणेच शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत. पिकांसह फळांना पाणी देण्याची वेळ असताना त्यांची वीज खंडीत झाली, तर तो आणखी संकटात सापडेल. तेव्हा तत्काळ शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन जोडून द्या. तसेच शेतकऱ्यांनी देखील जे शक्य असेल तेवढे बीलाचे पैसे भरून महावितरणला सहकार्य करावे, अशी कळकळीची विनंती कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत यांनी केली आहे.

राज्यात महावितरणकडून कृषीच्या थकीत बीलापोटी वीज खंडीत करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खुप नाराजी आहे. त्यामुळे त्या-त्या भागातील लोकप्रतिनिधींना देखील आमच्या वीज जोडण्या पुर्ववत करा, अशी मागणी करणारे फोन दिवसभर येवू लागले आहेत. कन्नड – सोयगाव मतदारसंघाचे आमदार उदयसिंह राजपुत यांनी आज महावितरणच्या तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. या बैठकी दरम्यान मतदारसंघातील ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्या आहेत. ती तात्काळ आजच्या आज जोडण्याच्या सूचना त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

जनावरांना चारा तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतातील पिके, फळबागांना पाणी देणे आवश्यक आहे. असे असताना महावितरणकडून मात्र, थकीत वीज बिलासाठी त्यांचे कनेक्शन कट केले जात आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे लोकप्रतिनिधी म्हणून मला फोन येत असल्याचेही राजपूत यांनी या वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या –