‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेत उद्यापासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ संचारबंदी

संचारबंदी

उस्मानाबाद – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता.कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात रात्रीच्या संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.त्यानुसार सोमवारपासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागु असणार आहे.जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पालिका, नगर पंचायतीच्या हद्दीमध्ये सोमवारपासून रात्रीची संचारबंदी लागु राहणार आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील निर्बंधात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून शहरातील गर्दी नियंत्रीत व कमी करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात रात्रीच्या संचारबंदीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

त्यानुसार सोमवारपासून सायंकाळी ७ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी लागु असणार आहे. संचारबंदी कालावधीत सर्व अत्यावश्यक बाबी वगळून व्यक्तींच्या हालचालींना प्रतिबंध राहील. रात्रीची संचारबंदी व रविवारचा जनता कर्फ्यु दिवशी अत्यावश्यक बाबींच्या अनुषंगाने शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप तसेच नगर पालिका, नगर पंचायत हद्दी बाहेरील क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज २४ तास सुरू राहतील.

महत्वाच्या बातम्या –