कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ‘या’ महापालिकेत आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी!

पुणे महापालिका

पुणे – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तर, केंद्र सरकारतर्फे देखील महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्रालयातर्फे देशातील टॉप-१० कोरोना हॉटस्पॉट जिल्ह्यांची आज घोषणा करण्यात आली आहे. ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये पुणे जिल्हा अव्वल आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुणे महापालिकेत आता सर्वसामान्य नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नगरसेवक आणि पदाधिकारीवगळता इतरांसाठी ही प्रवेशबंदी असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तसेच नागरिकांनी आपल्या तक्रारी ऑनलाईन करण्याच्या सूचना पुणे महापालिका प्रशासनानं केल्या आहेत.

दरम्यान पुणे शहरात आज ३ हजार २२६ रुग्णांची वाढ झालीय. तर आज दिवसभरात ३५ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. तसेच ७२५ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात आज दिवसभरात ३ हजार २६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात दररोज सरासरी ६ ते ८ हजार कोरोना बाधितांची भर पडतीये. त्यामुळे नागरिकांमधून काळजी व्यक्त केली जातेय. प्रशासनाकडूनही सतर्कता बाळगत कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत.

महत्वाच्या बातम्या –