राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचे संकट; कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

कोरोना

औरंगाबाद – कोरोना संसर्ग आटोक्यात येत आहे असे वाटत असताना औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पुन्हा वाढत आहे. बुधवारी जाहिर केलेल्या कोरोना रुग्णाची संख्या ही ५०० च्या घरात पोहोचली आहे. बुधवारी जिल्हा परिषदेतील तीन आधिकारी केरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. मात्र या संकटाच्या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण मात्र ७ मार्चपर्यंत रजेवर गेले आहेत. बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची कोरोना संदर्भात ऑडिओ क्लिप व्हारल झाली होती.

यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि कोरोना नियमांचे पालन व्हावे म्हणुन कडक पावले उचलली आहेत. यात मंगल कार्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसवर विषेश लक्ष असणार आहे. यात औरंगाबाद जिल्हाधिकारी मात्र ७ मार्चपर्यंत रजेवर गेले आहेत, महत्वाचे म्हणजे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन आधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बुधवारी समोर आलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे त्यांचा पदभार दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात येणार आहे.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने उपाययोजना कडक करण्यात येणार आहे असे जिल्हा परिषदेने सांगितले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण जिल्हाधिकारी यांनी अनंत गव्हाणे यांच्याकडे जिल्हाधिकारीपदाचा पदभार सोपवला आणि ७ मार्चपर्यंत रजेवर गेले आहेत. बुधवारी कोरोना रुग्णाचे प्रमाण ग्रामीण भागात वाढल्याने अनंत गव्हाणे यांनी तहसीलदारांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सद्य स्थितीत आजपर्यंत ४६२३५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले एकूण रुग्ण संख्या ४७९७९ इतकी आहे. एकूण ४९८ सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

महत्वाच्या बातम्या –