राज्यातील ‘या’ जिल्ह्यात कोरोना वाढतोय काल दिवसभरात नवे ६६१ कोरोनाबाधित

कोरोना

पुणे : पुणेकरांनो सावधान ! कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू पुन्हा वाढत आहेत. पुणे शहरात आज नव्याने ६६१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता १ लाख ९८ हजार ९५३ इतकी झाली आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती आज दिलेली आहे.

संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत जाणे टाळाच. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. त्या शिवाय आता उपाय नाही, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने ४ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ४ हजार ८३४ इतकी झाली आहे. शहरातील ३५८ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या १ लाख ९० हजार ९१८ झाली आहे.

पुणे शहरात आज एकाच दिवसात ४ हजार ६०६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ११ लाख ०८ हजार १५४ इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या ३ हजार २०१ रुग्णांपैकी २०१ रुग्ण गंभीर तर ३९८ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली आहे.

महत्वाच्या बातम्या –