‘या’ जिल्ह्याभरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करणे सुरु

कोरोना

हिंगोली – हिंगोली जिल्ह्याभरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करणे सुरु करण्यात येणार आहे. हिंगोली शहरासह जिल्हाभरामध्ये कोराना संसर्गाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेल्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे असे पाऊल उचलावे लागत असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी सांगितले.

हिंगोली शहरासह ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण हे खुपच धक्कादायक आहे. यातच कोरोना रुग्णांच्या मृत्यु दरामध्ये देखील खुप वाढ झाल्याने हिंगोलीकरांची चिंता वाढायला लागली आहे. दुसरीकडे सरकारीसह खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना खाटा देखील कमी पडत आहे. तर ऑक्सिजनचा पुरवठ्याच्या तुटवडा देखील पडला आहे. संचारबंदीच्या पहील्या दिवशी तर रस्ते, बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या. यासाठी जालीम उपाय म्हणुन नगर परिषदेने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोराना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुकानदारांना आरटीपीसीआर चाचणी केल्याचे प्रमाणपत्र तपासणी देखील करण्यात आली. ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नव्हते, तर त्यांना दंड देखील लावण्यात आला होता.

विनाकारण रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर हे स्वत: रस्त्यावर उतरले होते. शहरातील दुचाकी, रिक्षा, तसेच पायी चालणाऱ्यांची कोरोनाची चाचणी देखील करण्यात आली.  या निर्णयाने बऱ्याच प्रमाणात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मात्र नियंत्रणामध्ये आलेली दिसून येत आहे. शहरातील गांधी चौक, अग्रसेन चौक, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये  पोलिस उभे राहिलेले दिसल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मात्र रोडावलेली दिसून आली. काहींनी तर पोलिसांना बघताच काठता पाय घेत, आल्यापावली घरी परतत होते. विनाकारण फिरणाऱ्यांवर टाप बसावा तसेच कोरोना रुग्ण कमी व्हावे, तसेच तपासणी केल्यानंतर जर पॉझिटीव्ह निघाले तर त्यांना रुग्णालयामध्ये औषधोपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –