औरंगाबाद – कोरोनाची लस कधी येईल याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून होते , ती लस अखेर आज सकाळी औरंगाबादेत दाखल झाली आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली. बुधवारी पहाटे पुण्याहून लस घेऊन वाहन सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाले. औरंगाबादेत लस दाखल झाल्यानंतर या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लस दाखल झाल्या आहेत. तसेच लातूर आरोग्य उपसंचालक विभागासाठीही लस दाखल झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- अजून वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने आडमुठेपणाचे धोरण सोडून तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत – नवाब मलिक
- ‘हे’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली फळ, जाणून घ्या फायदे
- राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा
- कृषी कायद्यांच्या अमंलबजावणीला स्थगिती देणं हे सरकारचे काम होते, हे काम सुप्रीम कोर्टाचे नव्हते