कोरोना विषाणू घातक, काळजी घेण्याची गरज आहे अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या संकटाना सामोरे जावे लागेल

शरद पवार

मुंबई – महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत होते. पण काही जण कोरोना संदर्भातील नियम पाळत नसल्यामुळे आता कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

सध्या कोरोनाचं संकट महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढत असताना दिसतंय. राजकीय पक्षांचे कार्यक्रम, लग्न समारंभ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत आहे.

‘दिवसेंदिवस कोरोना वाढत असला तरी लोक गांभीर्याने याकडे पाहत नाहीयेत, राज्यातील नागरिक कोरोनाबाबत बेफिकीर असल्याचे दिसत आहे. कोरोना विषाणू घातक, काळजी घेण्याची गरज आहे.’ असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

‘सध्या लोकांना असे वाटत आहे कि आपण कोरोनाला पळवून लावले आहे आहे पण दुर्दैवाने तसे झालेले नाही आहे. दहा मधले सात लोक तोंडावर मास्क लावत नाहीत. अशा लोकांनी वेळीच काळजी घेवून सतर्क होण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या संकटाना सामोरे जावे लागेल.’ असे देखील ते म्हणाले.

दरम्यान महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे पुणे व नाशिक या शहरांमध्ये नाईट कर्फ्यूच्या सूचना दिल्या आहेत. तर, अमरावतीमध्ये मंत्री यशोमती ठाकूर यांच्या आदेशांनुसार सोमवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती शहर, अचलपूर शहर आठवड्याभरासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –