राज्यात कोरोनाचा कहर; गेल्या २४ तासांत ‘इतक्या’ रुग्णांची वाढ

कोरोना

मुंबई : कोरोनामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा पार कोलमडून गेल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी एकीकडे विविध उपाययोजना सुरू असताना दुसरीकडे मात्र कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील नव्या कोरोना रुग्णाने आता दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात १ हजार ३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या भारतभरात १४ लाख ७१ हजार ८७७ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

तर महाराष्ट्र, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात कोरोनाचा संसर्ग फैलावतच आहे. महाराष्ट्रात कोरोनाला ब्रेक दि चेनच्या नावाखाली रोखण्याचे काम सुरू आहे. पण कोरोना ती चेन ब्रेक करून सुसाट धावतोय. राज्यत गेल्या २५ तासांत ६३ हजार ७२९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनामुळे तब्बल ५९ हजार ५५१ जणाचा कोरोनाने बळी घेतला आहे.

महाराष्ट्रात एकूण रुग्ण : ३७ लाख ३ हजार ५८४
एकूण बरे झालेले रुग्ण: ३० लाख ४ हजार ३९१
एकूण मृत्यू : ५९ हजार ५५१
एकूण सक्रिय रुग्ण : ६ लाख ३८ हजार ३४

महत्वाच्या बातम्या –