राज्यात कोरोनाचा हाहाकार; गेल्या २४ तासात कोरोनाबाधीत रुग्णांत ‘एवढी’ वाढ

कोरोना

मुंबई – राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात उद्यापासून कडक निर्बंध तर काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनसह कडक निर्बंध लावले जात आहेत. पुणे जिल्ह्यात कडक निर्बंध म्हणजेच मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.

परंतु आज मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा महाउद्रेक झाला आहे असे म्हणाले तरी अतिशोयोक्ती होणार नाही. राज्यात आज 57074 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 27508 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.एकूण 2522823 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 430503 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.8% झाले आहे.हे सर्व कोरोनाचे आकडे निश्चितच सर्वांना चिंता करायला लावणारे आहे. याच पार्श्वभूमीवर कडक निर्बंध वा लॉकडाऊन करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक नुकतीच पार पडली आहे. या बैठकीनंतर मंत्री नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. ‘राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्यात येणार नसून शनिवारी, रविवारी (१०-११ एप्रिल) म्हणजेच वीकेंड लॉकडाऊन करण्यात येईल. तर ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात येतील. राज्यात उद्यापासून रात्री आठ वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, मॉल, रेस्टॉरंट, बार हे बंद राहतील. मात्र, होम डिलीव्हरी सुरु असेल.

तर, , निम्म्या क्षमतेने सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहेत. याबाबत लवकरच सविस्तर नियमावली जाहीर करण्यात येईल,’ अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली असून निर्बंधांबाबत आजच नियमावली जाहीर करण्यात येईल व उद्या रात्री आठ वाजल्या पासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –