राज्यात कोरोनाचा कहर! गेल्या २४ तासात तब्बल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

कोरोना

मुंबई – गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाले, मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्य सरकार वेळीच परिस्थीवती नियंत्रणात पावले उचलत आहे.

मात्र, मोठ्या प्रमाणावर नागरिक कोरोना नियम पळत नसल्याचं दिसून आलं आहे. याचाच परिणाम सद्या रोजच्या वाढत्या रुग्णसंख्येवरुन दिसत आहे. एकीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असतानाच आज राज्यात नव्या कोरोना रुग्णांचा विस्फोट झाला आहे. आज तब्बल नव्याने ११ हजार १४१ रुग्णाची भर पडली आहे.

दरम्यान, ६ हजार १३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आता पर्यंत २० लाख ६८ हजार ४४ नागरिक कोरोनमुक्त झाले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सद्या ९७ हजार ९८३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.१७ टक्के झाले आहे. गेले काही दिवस दररोज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याची संख्या ही १० हजारांपर असल्याने राज्याच्या चिंतेत भर पडत आहे.

औरंगाबादेत अंशतः लॉकडाऊन !

गेल्या १५ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन करण्यापेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी अंशत: लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. औरंगाबादमध्ये येत्या ११ मार्चपासून अंशतः लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन ४ एप्रिलपर्यंत राहिल. त्याचबरोबर शनिवार आणि रविवार संपूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –