शेतकऱ्यांवर पुन्हा संकट; पुढील ४८ तासांत राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

पाऊस

पुणे – यंदा मार्च महिन्यामध्येच राज्यातील काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. पुढील ४८ तासांत मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्याचबरोबर जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक, पुणे, अहमदनगरमध्ये देखील पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानं जिल्ह्यातील चाडस, काटा, कोंडाळ, चिखली, पंगरखेडा , शिरपूर, केनवड, मोठ नुकसान  झाल या अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं काढणीला आलेल्या हळद, हरबरा,गहू,टरबूज, ज्वारी, कांदा, मका पिकासह फळबागांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे.

अमरावती जिल्ह्यात १८ मार्चला गारपीट झाल्यानंतर काल रात्री पुन्हा एकदा वादळी पाऊस व गारपीट झाली. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ९ तालुक्याला या वादळी पावसाचा तडाखा बसला. तर वीज अंगावर पडून अविनाश गोल्हर या २९ वर्षीय शेतकरी तरुणाचा यात जागीच मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे.

महत्वाच्या बातम्या –