कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘या’ जिल्ह्यात आजपासून रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी

संचारबंदी

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी पृश्वीराज बी. पी. यांनी आजपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संचारबंदीच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलय. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात सोमवारी ४१ कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने कडक निर्णय घेण्यास सुरूवात केली आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २५ हजारांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्य ५९८ म्हणजेच सहाशेच्या घरात पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांचा आकडा ७०८ वर पोहोचला आहे.

जिल्हा प्रशासन कोणतीही परीस्थिती हाताळायला सज्ज आहे. माञ कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून लातूर जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत आहे. मागील आठवड्यातील शनिवार आणि रविवारी अवाहन केलेल्या जनता कर्फ्यूला नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.

महत्वाच्या बातम्या –