नांदेड – राज्यात कोरोना वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना केल्या जात आहे. या उपाय योजना करताना स्थानिक प्रशासन आपल्या भागातील कोरोना परिस्थिती लक्षात निर्णय घेत असते. असाच निर्णय नांदेडच्या जिल्हा अधिकारी यांनी घेतला आहे. नांदेड जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री पासून जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लावण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे, पण हातावर पोट असणाऱ्यांचं काय ? असा सवाल विचारल्या जात आहे.
जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले. कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजनांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी सकाळी सर्व विभाग प्रमुखांसोबत ऑनलाईन बैठकीत निर्देश दिले होते.
सदर बैठकीस जिल्ह्यातील आमदारांनी सहभाग घेत सूचना केल्या. जिल्ह्यातील वजिराबाद व इतर प्रमुख बाजारपेठांमध्ये सर्व दुकानमालकांच्या कोरोना चाचण्या, महानगरपालिकेच्या जंगमवाडी, सांगवी, तरोडा, देगलूर नाका या भागातील दवाखान्यांमध्ये लसीकरण व कोरोना चाचणी सुरू करण्याची आवश्यकता विषद करण्यात आले. आमदार हंबर्डे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात 19 ते 25 मार्चपर्यंत संध्या. 7 ते सकाळ 6 वाजेपर्यंत संचारबंदी
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
- राज्यात लवकरच कडक निर्बंध लागणार; राजेश टोपे यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती
- आता राज्य सरकार शेतमालाचा दाम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे पाठवणार