‘या’ जिल्ह्यासह राज्यात दोन दिवस कोरोना लसिकरणाला स्थगिती देण्याचा निर्णय

कोरोना लस

मुंबई – देशासह राज्यात शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन झाले. सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना देण्यास सुरुवात झाली. राज्यात पहिल्या दिवशी २८ हजार ५०० कोरोनायोद्ध्यांना लस दिली जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर १०० प्रमाणे सुमारे २८ हजार ५०० आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाचे नियोजन करण्यात आलं आहे. ज्यांना लस देण्यात येणार आहे त्यांना शुक्रवारी सायंकाळपर्यत मेसेज पाठविण्याचं काम सुरू होतं.

त्यामुळे आत सर्वांची नजर ही लसीकरण मोहीमेवर आहे. मात्र ‘कोविन’ या कोरोना लसीकरण नोंदणी साठी असलेल्या ऍपमध्ये तांत्रिक समस्या, दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. लसीकरण सुरु झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातवरण निर्माण झाले होते. मात्र पहिल्याच दिवशी अडचण आल्यामुळे हिरमोड झाला आहे. डिजिटल नोंदणीत व्यत्यय येत असल्यामुळे हे लसीकरण थांबवण्यात आले आहे. मुंबईसह राज्यात रविवारी, सोमवार लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आरोग्य खात्याने जाहीर केलं आहे की, कोविन पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्राच्या मार्गदर्शक सुचनांनुसारच लसीकरण सुरू राहणार, आरोग्य खात्याने जाहीर केलं आहे. कोविन ॲपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे काम सुरू असल्याने दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस लसीकरण स्थगित करण्यात आले आहे

कोविड लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. आज तांत्रिक अडचण आली असता ऑफलाईन नोंदी करण्यास परवानगी शासनाने दिली होती. तथापि यापुढील सर्व नोंदी ऍप द्वारेच करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. ही बाब लक्षात घेता, मुंबईत रविवार दिनांक १७ जानेवारी २०२१ आणि सोमवार दिनांक १८ जानेवारी २०२१ असे दोन दिवस कोविड १९ लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. कोविन ऍप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.

या संदर्भात आरोग्य विभागाने राज्यात नियोजित लसीकरण सत्र रद्द केले नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. राज्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये दि. १८ जानेवारी पर्यंत त्याला स्थगिती देण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कुठलेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या –