अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी

farmer

औरंगाबाद – अवकाळी पावसाने मराठवाड्यात थैमान घातले आहे. त्यात जिल्ह्यात अनेक तालुक्यांना याचा फटका बसला आहे. त्याच्यामुळे शेतकरी हतबल झाले आहे. कन्नड तालुक्यातील देवगांव रंगारी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसाण झाले आहे

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने ऐन सोंगणीस आलेल्या गहु ,हरबरा ,ज्वारी हि पिके आडवी झाली आहे. तसेच कांदा, टमाटे, शेतात पडुण असलेल्या मक्का याही पिकांना चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक महासंकटात सापडला आहे.

देवगांव रंगारी परिसरातील देवळी, कानडगांव, देभेगांव, देवळाणा, माटेगांव, लामणगांव, विटखेडा, चांभारवाडी, ताडपिंपळगांव आदी भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शासनाने या पिंकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना  अर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.

महत्वाच्या बातम्या –