पुणे – देशात नव्या कृषी कायद्यांवरून ऐन थंडीत वातावरण तापलं आहे. गेले २९ दिवस दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे, या कायद्यांच्या समर्थकांची देखील संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने आज भाजपचे आज राज्यभर ‘शेतकरी संवाद अभियान’ सुरु आहे.या अभियानाअंतर्गत भाजपचे विविध नेते राज्यभर तसंच देशभरात कार्यक्रम घेऊन कृषी कायद्यांचं महत्त्व पटवून देत आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचत विरोधकांना देखील झापलं आहे.
दरम्यान, फडणवीस पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुक गावातील कार्यक्रमास थेट बैलगाडीवर स्वार होऊन दाखल झाले. त्यांच्या या बैलगाडी स्वारीची चर्चा चांगलीच रंगली आहे.त्यांच्यासोबत भाजप नेते हर्षवर्धन पाटील, जगदीश मुळीक, आमदार राहुल कुल, आमदार सिद्धार्थ शिरोळे, योगेश टिळेकर देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
‘मोदी सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय आणि नेहमीच राहील. शेतकऱ्याला त्याचा मालाचा योग्य मोबदला देण्यासाठी आणि शेतीचा मालक करण्यासाठी मोदींनी कृषी कायदे आणले मात्र विरोधक या कायद्यांबद्दल खोटा प्रचार करुन शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करत आहेत’ अशी टीका त्यांनी या कार्यक्रमावेळी केली.
‘मोदी सरकारचे कृषी कायदे म्हणजे शेतकऱ्यांना संरक्षण देणारे कृषी कायदे आहेत. सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोधकांनी अभ्यास करावा. कंत्राटी शेती करताना काही वाद झाले तर शेतकऱ्यांना कोर्टात जाता येणार आहे, हे या कायद्यात आहे. तसंच एमएसपी कुठेही रद्द होणार नाही, बाजार समिती बरखास्त केल्या जाणार नाही, हे या कायद्यात असूनही विरोधक शेतकऱ्यांना खोटं सांगून भडकवण्याचं काम करत आहेत’ असा घणाघात देखील फडणवीसांनी केला आहे.
या कार्यक्रमात आम्ही पुणे जिल्ह्यातील मांजरी बुद्रुक (ता. हवेली) येथून सहभागी झालो होतो. यावेळी शेतकर्यांशी संवादही साधला आणि मा. पंतप्रधानांचे संबोधन ऐकले. अतिशय सोप्या आणि साध्या शब्दात त्यांनी मार्गदर्शन करून कायद्याविषयीचे गैरसमज दूर केले.#PMKisanSammanNidhi #PMKisan https://t.co/0ajdsTYI3e pic.twitter.com/t2ES1guaIO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 25, 2020
महत्वाच्या बातम्या –
- खुशखबर! आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ‘एवढी’ रक्कम
- जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे
- गाजर खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का?
- अचानक हार्ट अटॅक आला तर काय कराल, जाणून घ्या