तोडलेली विज तात्काळ जोडा विज तोडून शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करू नका – हर्षवर्धन जाधव

हर्षवर्धन जाधव

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील खरीप हंगाम वाया गेला, विज कट केल्याने पिकं वाळून जात आहे. तोडलेली विज तात्काळ जोडा विज तोडून शेतकऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे पाप करू नका असे महावितरण अधिकाऱ्यांना खडसावले.स्व रायभान जाधव यांची संस्कृति आसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्याना जाधव कुटुंब वाऱ्यावर सोडणार नसुन शेतकऱ्याना त्यांचे न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

शहरात जैन मंगल कार्यालयात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याना मार्गदर्शन करण्यासाठी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यास माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मार्गदर्शना केले तर यावेळी मा आ तेजस्विनीताई जाधव व ईशा झा यांची उपस्थिती होती .

ज्या पक्षाचे मुख्यमंत्री त्याच पक्षाचे आमदार तालुक्याला लाभले आहे.  तालुक्यातिल शेतकरी व जनतेसाठी सुवर्ण काळ असायला पाहिजे होता. मात्र शेतकरी अडचणीत असताना आमदारच जर वीज बिल भरा म्हणत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. पन्नास टक्केच्या आत आनेवारी लावली असताना सुध्दा महावितरण कुणाच्या हिम्मतीवर शेतकऱ्याची विज खंडित करत आहे. स्वतःचे पोट कापून दूसऱ्याचे पोट भरणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्याना दुष्काळ निधि, केंद्र सरकारचा निधि अशा कोणत्याही स्वरूपाची मदत देण्यात आलेली नसताना अडचणीच्या काळात सुध्दा शेतकऱ्याच्या खिशातले पैसे काढून घेण्याचे काम सुरु आहे.

तालुक्यातील अनेक गावात दोन दोन महीने झाले तरी डीपी बदलून देण्यात आली नाही.  ४८ तासाच्या आत डीपी दुरुस्त करून न दिल्यास ग्राहकास पन्नास रुपये तासा प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा कायदा आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यानी तात्काळ तक्रार निवारण केंद्रात आपली तक्रार दाखल करावी. त्या शिवाय महावितरण ला जाग येणार नाही. आनेवारी लावतांना कृषि विभागाने दिलेला  आहवाल ग्राह्य धरून पिकविमा शेतकऱ्यांना मिळवून द्यावा शेतकऱ्याचे प्रश्न मार्गी लागल्या शिवाय मी शांत बसणार नसल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले. यावेळी तालुक्यातील अनेक गावांतुन आलेले  शेतकरी हजर झाले होते.

महत्वाच्या बातम्या –