वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका – राजू शेट्टी

राजू शेट्टी

कोल्हापूर – सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. ‘२ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय, राज्य सरकारकडून अचानक वीजबिल सक्ती केली जातेय. मात्र सर्वसामान्यांनी पैसे कुठून आणायचे?,’ असा सवाल राजू शेट्टींनी उपस्थित केला आहे.

राजू शेट्टींनी दिलेल्या इशाऱ्या नुसार आज हजारो शेतकरी वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी कोल्हापुरात पुणे-बेंगलोर (NH-4) महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजुंना वाहनांची मोठी रांग देखील लागली आहे. महामार्गावरील पंचगंगा नदी पुलावर आंदोलकांसह विविध नेते देखील सहभागी झाले होते. अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.

तर, मोठ्या प्रमाणात जमाव जमल्याने कोरोना नियमांना देखील हरताळ फासण्यात असल्याचं दिसून आलं. हे या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना, माकप, भाकप आणि इतर राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. तर, भाजपने मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे.

दरम्यान, ‘वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नका, सरकारने दिलेलं आश्वासन पाळावं. सर्वसामान्य वीज ग्रहाकाना दिलासा द्या, अन्यथा वीज बिल माफ करेपर्यंत गप्प बसणार नाही. जबरदस्ती वीज बिल वसूल कराल तर आम्ही कायदा हातात घेवू,’ असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –