कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर मग टाळे ठोका – उद्धव ठाकरे

कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर मग टाळे ठोका - उद्धव ठाकरे road pink

केमिकल कंपन्यांच्या प्रदूषणाने डोंबिवलीकर हैराण झाले आहे. डोंबिवलीमध्ये रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर केडीएमसीमध्ये सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी कंपन्यांना इशारा दिला आहे. या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर मग टाळे ठोका असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केमिकल कंपन्यांना दिला आहे.

यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक प्रदूषणाबाबत 3 टप्प्यात कार्यवाही आणि कारवाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात शासनाच्या यंत्रणा कारखान्यांची तपासणी करून जी सुरक्षा उपकरणे लावण्यास सांगतील ती संबंधित कंपन्यांनी लावावी. ही उपकरणे लावायची की कंपनीला कुलूप लावायचे हा निर्णय कंपनी मालकांनी घ्यावा असे आदेश दिले दुसऱ्या टप्प्यात घातक केमिकल वाहून जाण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे आणि

तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात घातक केमिकल कंपन्या नागरी वस्तीच्या बाहेर हलवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपण 15 दिवसांची मुदत दिली असून त्या कंपन्या कोणत्या? त्यांना कुठे जागा द्यायची? कोणाला कुठे हलवायचं याबाबतही आवश्यकतेनुसार निर्णय घेतले जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.