हिंगोली – जिल्ह्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी १ ते ७ मार्चदरम्यान संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी घोषित केली आहे. हिंगोलीत रविवारी एकाच दिवसात ३२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली, तर १३ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.
दरम्यान, संचारबंदीच्या काळात जिल्ह्यात दुध विक्री केंद्र, दुध विक्रेते यांना सकाळी ७ ते ९ आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत मुभा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, मेडिकल, पेट्रोलपंप, रस्त्याचे कामे, पाणीपुरवठा, महावितरण, स्वच्छता आणि परवाणगीप्राप्त वाळू पुरवठा सुरू राहणार आहेत. या संबंधित अधिकारी कार्मचाऱ्यांना ये-जा करण्याची मुभा असणार आहे. मात्र, त्यांच्याकडे ओळखपत्र असणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय इतर कोणीही रस्त्याने, बाजारात, गल्लीत, गावात बाहेर फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
७ दिवस एसटीही बंद
जिल्ह्यात संचारबंदी लागून असल्यामुळे ७ मार्चपर्यंत आगारातून एकही बस धावणार नाही, असे आगारप्रमुख अभिजित बोरीकर यांनी सांगितले. येथील आगारात ३२ बस आहेत. या बसेसच्या दररोज १३० फेऱ्या होतात. या फेऱ्यांमधून आगाराला साडेतीन ते चार लाखांचे उत्पन्न रोज मिळते. आता ७ दिवस बस बंद असल्यामउले आगाराचे २८ ते ३० लाखांचे उत्पन्न बुडणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ चार मोठे निर्णय
- पदवी परीक्षा १६ मार्चपासून ही परीक्षा ऑनलाइन होणार का ऑफलाइन, जाणून घ्या
- नागरिकांनी कठोरपणे अंमलबजावणी करावी अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल
- मोठी बातमी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेतली कोरोना प्रतिबंधक लस!
- पोटातील गॅसचा त्रास दूर करण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय