‘या’ जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत कर्फ्यू लागू

संचारबंदी

बीड : बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी याबाबतचे आदेश काढलेत. बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे. तसंच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत.

हे आहेत आदेश
१) बीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहतील. हॉटेलमध्ये कोरोना नियमांचं पालन करावं.
२) जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर १८ मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद
३) जिल्ह्यातील फळ विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांनी मास्क लावून फळविक्री करावी. जो नियम मोडेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
४) सर्व दुकानदार तसंच आस्थापनाधारक यांनी दर १५ दिवसाला कोरोना चाचणी करुन त्याचा अहवाल जवळ बाळगणं अत्यावश्यक
५) जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापने, दूध विक्रेते दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील. मेडिकल सेवा वगळून.

दरम्यान, आज जिल्हाभरात १६१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. बीड शहरात ८२ रुग्ण आहेत. अंबाजोगाईमध्ये ३३, आष्टी १८, बीड ८२, गेवराई १२, केज १२, माजलगाव ५, परळी ७, पाटोदा २, शिरूर ५ तर वडवणीत ५ रुग्ण आढळून आलेले आहेत. बीड शहरासह तालुक्यात सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. गेल्या तीन दिवसांपासून बीड शहरातील व्यापाऱ्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. आज एकूण २७१ व्यापाऱ्यांची आतापर्यंत चाचणी झाली असून यामध्ये १४ व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

महत्वाच्या बातम्या –