पुणे – जिल्हयातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदानाचे दिवशी शिरुर, वेल्हा, आंबेगाव, जुन्नर, दौंड, इंदापूर व बारामती तालुक्यातील आठवडे बाजार भरविण्याबाबत मनाई आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
शिरुर तालुक्यातील मदनगाव फराटा, पाबळ, वेल्हा तालुक्यातील वेल्हे बु., आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव, जुन्नर तालुक्यातील आळे, निमगांव सावा, दौंड तालुक्यातील यवत, इंदापूर तालुक्यातील रुई व निरगुडे तसेच बारामती तालुक्यातील सांगवी गावामधील आठवडे बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.
त्यापुढील शुक्रवार दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी पासून आठवडे बाजार पूर्ववत भरविण्यात यावेत, असेही आदेशाद्वारे कळविण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- धक्कादायक : मयत शेतकऱ्याच्या नावावर उचलले पीककर्ज
- राज्यातील ‘या’ शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा
- केंद्र सरकार तीनही कृषी कायदे रद्द करेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार – संयुक्त किसान मोर्चा
- ‘हे’ आहे जगातील सर्वात शक्तिशाली फळ, जाणून घ्या फायदे