‘या’ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पिकांचे नुकसान

लातूर – शहर व तालुक्यात शनिवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास पाऊसाला सुरुवात झाली त्यानंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसाने चांगलाच जोर धरला. या पाऊसात शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

आधीच शेतकऱ्यांवर कोरोनाचे सावट त्यात अवकाळी पाऊसाने हजेरी लाऊन भाजीपाला तसेच फळ भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने आंब्याचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही दिवसातच आंबे बाजारात येणार आहेत पण त्या पूर्वीच अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान केले. त्यामुळे आंब्याची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

लातूर जिल्ह्यात झालेल्या या अवकाळी पाऊसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून अहवाल पाठविण्याचे निर्देश कॉंग्रेस नेते धीरज देशमुख यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानी बद्दल राज्य सरकार नक्की मदत करेल अशी अपेक्षा धीरज देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या –