राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ नुकसान

शेतकरी चिंताग्रस्त

मुंबई – दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले आहे. यामध्ये राज्यात सर्वत्र मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळे आधीच कोरोना काळात कंबरडे मोडलेल्या शेती व्यवसायाला पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. तर राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट आणि अवकाळी पाऊस असे दुहेरी संकट उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटांना सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे . महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचे पुन्हावर आलेले भूत नक्कीच परत गाडले जाईल. असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

‘महाराष्ट्राला सध्या एकीकडे कोरोनाच्या दुसऱया लाटेचा तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा तडाखा सहन करावा लागत आहे. कोरोनाग्रस्तांचे आकडे नवनवे उच्चांक गाठू लागले आहेत. पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला असतानाच अवकाळीचीही लहर फिरली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून राज्याच्या मोठय़ा भागाला अवकाळी पाऊस, गारपीट याचा तडाखा बसत आहे. नेहमीप्रमाणे त्याचा फटका बळीराजालाच बसला आहे. गेल्या वर्षीपासून अवकाळी हे जणू नेहमीचे संकट झाले आहे. गेल्याच महिन्यात राज्याच्या मोठय़ा भागाला अवकाळी पावसाचा फटका बसला होता.

त्यात आता पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्याने बळीराजाच्या उरल्यासुरल्या आशेवर आणि उत्पादनावर पाणी फेरले आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि पुनःपुन्हा बसणारा अवकाळीचा तडाखा अशा दुहेरी संकटाला सध्या महाराष्ट्र तोंड देत आहे. महाराष्ट्र या दोन्ही संकटांना तोंड देण्यास समर्थच आहे. सरकारचे प्रयत्न आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोनाचे पुन्हा वर आलेले भूत नक्कीच परत गाडले जाईल. प्रश्न आहे तो अवकाळीच्या लहरीचा व ही नैसर्गिक लहर आटोक्यात आणण्याचा. निसर्गाची लहर मानवी नियंत्रणापलिकडेच आहे. मात्र निसर्गावर कोणाचे नियंत्रण नाही असे म्हणून हतबल होऊन कसे चालेल? कोरोना निर्बंध आणि अवकाळीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मदतीचा भक्कम हात देऊन उभे करावेच लागेल. राज्य सरकार त्यासाठी कटिबद्ध आहे.’ असा आश्वासन आजच्या सामना अग्रलेखातून देण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –