राज्यातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

गारपीटी

परभणी – आधीच दुष्काळाचा फटका त्यात कर्जाचे डोंगर अशा समस्यांना तोंड देत असताना बळीराज्याला अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसास गारपीट होत आहे. शनिवारी सायंकाळी ६ वाजेपासून परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रब्बी हंगामातील हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाका बसला असून फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी देशोधडीला लागला आहे.

परभणी जिल्ह्यात मागील पाच ते सहा वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी होत असल्यामुळे खरीप व रब्बी हंगामातील दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. त्यातच गेल्यावर्षीपासून कोरोना महामारी अन् त्यात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यातच कोरोना महामारीमुळे शेतमालाला बाजारपेठेत भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत.

अशा प्रतिकूल परिस्थिती शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली होती. धरण व नदीला मुबलक पाणी असल्यामुळे रब्बी हंगामातील पिके चांगली आल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत होते. परंतु, ऐन रब्बी हंगामातील पिके काढणीस आली असता परभणी जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतातील उभे पिके आडवी झाली.

महत्वाच्या बातम्या –