जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

जालना – गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. उन्हाळ्यात येणाऱ्या फळांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

आधीच कोरोनाचे मोठे संकट त्यात आता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक वाढले आहे. बदनापूर येथे बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या गव्हाचे देखील नुकसान झाले असून फळांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. वादळवाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोसंबीची फळगळ झाली तसेच कांदा बियाण्याचा पिकालाही फटका बसला.

बदनापूर तालुक्यात मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यांसह पाऊस होत आहे. दरम्यान, बुधवारी तालुक्यातील देवपिंपळगाव येथील नवनाथ पठारे यांच्या शेतातील गोठ्यावर वीज कोसळून दोन म्हशी ठार झाल्या आहेत. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना आता अस्मानी संकट उभे राहिले आहे.

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. यात मोसंबी, आंबा अशा फळपिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना मदत करावी.

महत्वाच्या बातम्या –