‘पोकरा’च्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया करणार सुलभ – दादा भुसे

‘पोकरा’च्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया करणार सुलभ - दादा भुसे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेचा लाभ गरजूंपर्यंत पोहचण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करणार असल्याचे आश्वासन दादाजी भुसे यांनी एका बैठकी दरम्यान बोलताना दिलं. राज्य शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात ग्राम कृषी संजीवनी समिती अध्यक्षांची बैठक भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात आयोजित करण्यात आली होती. भुसे यांनी यावेळी विविध गावांच्याअडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या.

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम

दादा भुसे म्हणाले कि, पोकरामध्ये ग्राम कृषी संजीवनी समित्यांच्या अध्यक्षांनी केलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात येईल. अधिकाधिक शेतक-यांना योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यादृष्टीने पोकरातील कामांचा आढावा प्रशासनाने नियमित घेण्याचे निर्देश भुसे यांनी दिले. योजनेत वैयक्तिक लाभाचे २२ घटक आहेत. या सर्व घटकांची व लाभाची माहिती सर्व ग्रामपंचायतींना सविस्तर पत्राद्वारे तत्काळ कळवण्यात यावी, समितीच्या सदस्यांनीही माहिती घेऊन आपल्या गावातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून द्यावा, असेही दादा भुसे आवाहन  केले.