शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी कुलगुरूंना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

उदय सामंत

पुणे – राज्यात कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यातच खबरदारी म्हणून शासनाने योग्य ते उपाय करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील व्यवस्थितरित्या पार पडण्याचे शासनापुढे आव्हान आहे.

यातच आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील काही विद्यापीठाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाइन परीक्षेवर भर देण्याच्या सूचना सर्व कुलगुरूंना दिल्या आहेत.

परीक्षे संदर्भात उदय सामंत यांनी सर्व कुलगुरूं सोबत चर्चा केली असता, त्यात परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या, परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाणार आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरवात झाल्याने अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेणे मह्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा विचार करत परीक्षा ऑनलाइन पद्धतीद्वारे घेण्यावर भर देण्याची चर्चा झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.

पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा १० एप्रिलपासून सुरू होणार असून, या परीक्षेला ६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मोठ्या प्रमाणावर परीक्षेसाठी विद्यार्थी एकत्र आल्यास विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दुष्टीने परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे परीक्षा विनाअडथळा पार पडण्यासाठी योग्य नियोजन सुरू करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –